Ads

घुग्घुस शांती धाम (हिंदु) स्मशान भुमी येथे स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करा

घुग्घुस :-घुग्घुस येथील शांती धाम (हिंदु) स्मशान भुमी येथे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंतविधी करण्याकरीता नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शांती धाम हिंदु स्मशान भुमी येथे एक हायमार्ट लाईट ची व्यवस्था आहे परंतु त्या लाईट चा प्रकाश हा शव दाहिनी पर्यंत येत नसल्याने तिथे मोबाईल टॉर्च लावुन अंतविधी करावा लागत आहे .
तसेच मेन गेट जवळ हि लाईट ची सुविधा नसल्याने त्या जागी सुध्दा खुप अंधार राहतो.
Arrange Street Light at Ghugghus Shanti Dham (Hindu) Crematorium
त्या करीता वंचित बहुजन आघाडी, जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात नगर परिषद घुग्घुस मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे
मेन गेट ते शव दाहिनी पर्यंत स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करण्यात यावी. जणे करुन रात्रो ला सुध्दा अंतविधी करण्यास घुग्घुस येथील नागरिकांना त्रास होणार नाही
निवेदन सादर करतांना जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, अशोक भगत, आशिष परेकर, नकुल निमसटकर व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment