राजुरा ता.प्र -वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीत व्यवस्थापन कामगार व ठेकेदारी कामगारांना नियमानुसार व सुरक्षा विषयक सोईसुविधा पुरवित नसून मनमानी पध्दतीने निर्णय घेऊन कामगारांना वेठीस धरत आहे. या अन्यायकारक धोरणांविरूध्द कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून या अन्यायाविरोधात सास्ती ओपन काष्ट कोळसा खाणीतील आयटक, एचएमएम, बीएमएस व इंटक या चारही कामगार संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिनांक १ जून पासून द्वार सभा व आंदोलन सुरू असून यानंतर उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. या दरम्यान न्याय्य मागण्यांची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चारही कामगार संघटनांनी दिला आहे.
कोळसा खाण परिसरात मोठ्या प्रमाणात माती व कोळश्याची धुळ उडत असल्याने प्रदुषण होत आहे, त्यावर तातडीने आळा घालावा, खाणीत सुरक्षा नियमांचे पालन करण्यात यावे, खाणीमध्ये विश्रांती साठी शेडची सोय करावी, खाणींमध्ये कार्यरत सर्व कामगारांच्या काम करण्याचे ठिकाणी थंड व शुध्द पाण्याची सोय करावी, कामगारांना दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाण्याच्या बाटल्यां व दुपट्टा द्यावा, सर्व ठेकेदारी कामगारांची बायोमेट्रिक हजेरी लावण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.
श्रमिक संघटनानी दिलेल्या आंदोलन नोटीस वर सास्ती व्यवस्थानाने ६ जून २०२४ ला बैठक बोलाविली होती, मात्र त्या बैठकीत संगठन प्रतिनिधिंचे काहीही न ऐकता व्यवस्थापक बैठकीतून निघून गेल्याने कामगारांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आज झालेल्या द्वार सभेला एचएमएसचे अशोक चिवंडे, रंगराव कुळसंगे, विजय कानकाटे, सुधाकर घुबडे, सुरज साहेब, आर.आर.यादव, आयटक चे दिलीप कनकुलवार, आर.एम.झुपाका, दिनेश जावरे, सत्तूर तिरुपती, बीएमएस.चे गणेश पिसे, पांडुरंग नंदुरकर, मंगेश उरकुडे, इंटक चे संतोष गटलेवार दिनकर वैद्य, अनंता इकडे आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment