जावेद शेख तालुका प्रतिनिधीभद्रावती:-बरांज गावाचे पुनर्वसन करावे, कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांच्या पूर्ततेसाठी बरांज येथील प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात दिनांक 21 रोज शुक्रवारला तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक एमटा कंपनीच्या कोळसा खाणीवर धडकले.
यावेळी कंपनीच्या स्थानिक वरिष्ठ अधिकारी विकास मुखर्जी, आर बी सिंह,यांनी खासदार प्रतिभा धानोरकर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, वरोराचे छोटू भाई शेख,विलास टिपले, सरपंच डोंगे, यांचे सोबत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्याची तयारी दर्शवली, मात्र कंपनीचे मुख्य अधिकारी किंवा सक्षम अधिकारी यांच्याशीच यासंदर्भात चर्चा करण्यात येईल असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी घेतल्यामुळे ही चर्चा फिसकटली. दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 22 रोज शनिवारला दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कंपनी अधिकारी, खासदार प्रतिभा धानोरकर व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत खाणीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केल्यामुळे आज तिसऱ्या दिवशीही सदर कोळसा खाणीचे कामकाज बंद होते. आतापर्यंत मागण्याबाबत प्रकल्पग्रस्तांचे अनेक आंदोलने होऊन सुद्धा कंपनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कंपनीच्या विरोधात रोष असून ते अधिक आक्रमक झाले आहे. आंदोलनादरम्यान कोणतिही अनुचीत घटना घडू नये म्हणून अतिरिक्त पोलिसांची कुमुक मागविण्यात आली होती. यावेळी खाण परीसरात पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, ठाणेदार बिपिन इंगळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 comments:
Post a Comment