Ads

आदर्श शाळेत नवागतांचे स्वागत, रौप्य महोत्सव लोगो अनावरण सोहळा संपन्न

राजुरा 1 जुलै:-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे सत्र २०२४-२५ मधील शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात आले.
Adarsh ​​School Welcomes Newcomers, Silver Festival Logo Unveiling Ceremony Completed
यावेळी त्यांना मोफत पाठयपुस्तक वितरण करून व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला पंचेवीस वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सव लोगो चे अनावरण करण्यात आले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या स्वाती प्रदीप देशपांडे, सुनैना पराग तांबेकर यांच्या वतीने पंचेवीस विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ऍड. संजय धोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक अविनाश निवलकर, रजनी शर्मा, महिला जिल्हाध्यक्षा,नेफडो, कृतिका सोनटक्के, प्राचार्य, सोनिया गांधी कॉन्व्हेंट राजुरा, पूजा घरोटे, माता पालक प्रतिनिधी, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे,आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छ.शिवाजी महाराज स्काऊट लीडर बादल बेले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शिक्षिका सुनीता कोरडे, ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, जयश्री धोटे,रुपेश चिडे, नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, विकास बावणे, वैशाली चिमुरकर, मनीषा खामनकर, पूजा बावणे, अंजली कोंगरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिजामाता गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी केले तर आभार अर्चना मारोटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड विद्यार्थ्यां,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, संघटक यांनी अथक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment