Ads

आनंदवनातील विवाहित महिलेच्या हत्येतील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

(सादिक थैम)वरोरा : आनंदवनातील विवाहित महिलेचे हत्येतील आरोपी समाधान माळी याला 28 जून 2024 ला न्यायालयाने चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली परंतु आरोपींनी पोलीस कोठडीत असताना आत्महत्या केल्याची घटना 30 जून 2024 ला सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Accused in murder of married woman in Anandavan commits suicide in police custody
पोलीस स्टेशन मधील स्टेशन डायरी रुमला लागूनच पोलीस कस्टडी असून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी 24 तास कर्तव्यावर हजर असताना आरोपी समाधान माळी याने गळफास घेऊन आत्महत्या कशी केली. हा संशोधनाचा विषय असून पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी हा कृष्ठरोगी होता. उपचार करुन घेण्यासाठी तो आनंदवनात आला. आणि मृतक महिला आरती सोबत त्याची ओळख झाली. आणि काही दिवसांनी या दोघांचे प्रेमाचे सूत जुळले. परंतु आरती विवाहित असल्यामुळे मृतक आरोपीला प्रेम करण्यास नकार दिला होता असें कळते. त्यामुळे मृतक आरोपीला राग आला होता. त्यामुळे आरोपी समाधान माळी यांनी मार्च महिन्यातआनलाइन बोलाविलेल्या शस्त्राचे सहाय्याने गळ्यावर वार करीत आरतीची जीवनयात्रा संपविली. नंतर आरोपी समाधान माळी याला काही तासातच वरोरा पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. त्याने रेफ करून आरतीची हत्या केल्याचे कबूल सुद्धा केले होते. त्याला 28 जून 2024 ला वरोरा न्यायालयात हजर केले असता 4 जून पर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली होती. आरोपीने गुन्हा कबुल केला होता परंतु पून्हा आरोपीसोबत कोणी सामील होते का? याबाबत चौकशी सुरु होती. पोलीस रिमांड असलेल्या आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने बुटाचे लेसला कोठडीतील हुकला लटकता गळफास घेतला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
आरोपीने बुटाचे लेसला कोठडीतील हुकला लटकावून गळफास घेतला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

रात्रौ 10 वाजता आरोपीला लाकअप मध्ये टाकले. लाकअप गार्ड थोडावेळसाठी कुठेतरी गेला असता कोणाचेही लक्ष नसताना आरोपीने कोठडी जवळच ठेऊन असलेल्या बुटाचे लेस काढले. आणि कोठडीत एका बाजूने असलेल्या हुकला लेस लटकावून गळफास घेतला. आरोपीची मनस्थिती बरोबर नव्हती. जबाबदार लाकअप गार्ड आणि एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई सुरु असल्याचे कळते. तसेच सदर घटनेत ज्या अधिकाऱ्यांनी तपासात हयगय केली आहे असें चौकशीत समोर आल्यानंतर त्यांना सुद्धा निलंबित करण्यात येईल. सदर आरोपीच्या आत्महत्या बाबत चौकशी सी आय डी कडे वर्ग करण्यात आली आहे.

आरोपीचे शव शव विच्छेदन साठी चंद्रपूर ला पाठविण्यात आले असून मृतक आरोपीचे आई वडील येतपर्यंत शव विच्छेदन केल्या जाणार नाही. आत्महत्या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment