सादिक थैम :- वरोरा शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील राजीव गांधी वार्डात नुकत्याच बांधलेल्या नाल्याची कडा फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात शिरलेल्या पाण्यामुळे त्यामुळे त्यांचे नुकसान झालेले आहे. नालीचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी वरोरा आम आदमी पक्षाच्या वतीने नगरपालिकेसमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.
येथील राजीव गांधी वार्डात दोन महिन्यापूर्वीच नाल्याची संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र अवघ्या दोन महिन्यापूर्वी बांधलेली ही संरक्षण भिंत शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात तुटली. त्यामुळे वार्डातील अनेक लोकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरून त्यांच्या सामानाचे नुकसान झाले आहे.घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना राहण्याची सोय सुद्धा राहिलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संरक्षण भिंतीच्या बांधकामात लोखंडी सळाकीचा म्हणावा तसा वापर झाला नाही. या नादीच्या नाल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असल्याने ठेकेदार व संबंधित इंजिनियर यांच्यामुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नालीचे बांधकाम करणारे ठेकेदार व त्यावर देखरेख ठेवणारे अभियंता यांचे वर कारवाई करण्यात येऊन नागरिकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा मागणीची निवेदन वार्डातील नागरिकांनी दिले.
यापूर्वी नगरपरिषदेसमोर राजीव गांधी वार्डातील नागरिक यांनी ठिय्या आंदोलन केले. यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक गजानन भोयर यांना मागणीची एक निवेदन देण्यात आले.
यावेळी वार्डातील अनेक महिला व पुरुष हे आंदोलनात सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment