Ads

बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वरोरा प्रतिनिधी :- शहरातील मालवीय वॉर्डात दूषित पाणी प्यायल्याने अतिसाराची लागण झालेल्या एका चार वर्षे बालकाचा मृत्यू झाला. या मृत्यूस नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे बालकाच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणास जबाबदार असणाऱ्या स्वच्छता व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात अशी मागणी भाजपचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
File a case of culpable homicide against those responsible for the child's death
वरोरा शहरातील मालवीय वॉर्डात दुषित पाणी पिल्याने अतिसाराची (डायरीया) लागण होऊन उपचारापूर्वीच चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यु झाला. तसेच मालवीय वार्ड परीसरामध्ये बऱ्याच नागरीकांना डायरीयाची लागण झाली.
वरोरा नगर परीषद मार्फत नाले सफाई व स्वच्छेते विषयी उपाययोजना पावसाळा सुरु होण्यापुर्वी करणे आवश्यक होते. पण ते काम वरोरा नगर परीषद मार्फत करण्यात आलेले नाही. त्यासंदर्भात वरोरा नगर परीषदेला वारंवार निवदने देण्यात आली होती. पण शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे दिसून येते. ज्या कंत्राटदाराला स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे. त्यांच्या कामावार आता प्रश्नचिन्ह निर्माण होत असून कंत्राटदाराला पूर्ण कार्यक्षम पद्धतीने कार्य करण्याचे निर्देश द्यावे अथवा त्याचा कंत्राट रद्द करावा अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
तसेच पाणी पुरवठा व आरोग्य विभागामार्फत वरोरा शहरातील परिस्थीती लक्षात घेता पूर्व उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत वरोरा नगर परीषदेच्या भोंगळ कारभारमुळे एका निर्दोष बालकाचा जीव गेला. याला नगरपरीषद प्रशासन जबाबदार असून बालकाच्या आई वडीलास नुकसान भरपाई द्यावी.तसेच या प्रकरणामध्ये स्वच्छता व आरोग्य विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा या विरोधात त्या बालकाला न्याय मिळवून देण्याकरीता आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरोडा भद्रावती विधानसभा प्रमुख डॉ.रमेश राजुरकर यांनी या पत्रकातून दिला आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment