चंद्रपुर :-Crime News चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील नेताजी चौक संकुलात 30 जून 2024 रोजी रात्री 10 वाजता पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
यामध्ये बाबुपेठ नेताजी चौकातील शशिकांत विठ्ठल पेंदोर याने पत्नीवर सत्तूरने वार गंभीर जख्मी केला आहे. कपडे बदलत असताना मुलाच्या खिशातून लायटर पडल्याने पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्याने मुलगा घराबाहेर गेला. त्यानंतर शशिकांतने पत्नीवर हल्ला केला. ज्यात पत्नीच्या जबड्याला दुखापत झाली. यावेळी पत्नी संरक्षणासाठी घराबाहेर पळाली. त्यानंतर आजूबाजूचे नागरिक मदतीला आले आणि त्यांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती शशिकांत फरार आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे सपोनि मंगेश भोंगाडे तपास करत आहेत.
0 comments:
Post a Comment