भद्रावती तालुका प्रतिनिधी:- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट नियमितपणे सामाजिक उपक्रम राबवित असते. आज (दि. १ जुलै) ला डॉक्टर्स डे चे औचित्य साधून तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर्सचा त्यांच्या रुग्णालयात जावून सत्कार करण्यात आला.
self Doctor's Day Celebration on behalf of Srinivas Shinde Memorial Ravindra Shinde Charitable Trust
आज धकाधकीचे आयुष्य आहे. माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही. अशा वेळी शारीरिक समस्या उद्भवल्यास मनुष्य आधी डॉक्टर कडे जातो. डॉक्टर रुग्णांना प्राथमिकता देवून त्यांची सुश्रुषा करतो. तेव्हाच डॉक्टर चे महत्व कळते. समाजाप्रती असलेले त्यांचे योगदान समजून घेण्याचा व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस म्हणून डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो.
या उपक्रमात तालुक्यातील ग्रामिण रुग्णालय येथील डॉ. मनिष कुमार सिंग, डॉ. युगेश गेडाम, डॉ. पल्लवी सावे, डॉ. हर्षल जोशी, भद्रावती येथील डॉ. आनंद निते, डॉ. रमेश मिलमिले, डॉ. राहुल साळवे, डॉ. विवेक शिंदे, डॉ. प्रिया शिंदे, डॉ. वैभव शिंदे, डॉ. प्रविण केशवानी, डॉ. मनोज हक्के, डॉ. विलास बांदुरकर, डॉ. प्रशांत नागपूरे, डॉ. मयुरा अवताडे, डॉ. नंदीनी गुंडावार आदी डॉक्टर्सची भेट घेवून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, निवृत्त शिक्षक पोमेश्वर टोंगे यांच्या व्दारा त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, पोमश्वर टोंगे, संजय तोगट्टीवार आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment