Ads

तामिळनाडूच्या ब.स.पा. प्रदेशाध्यक्ष K. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा तपास C.B.I. मार्फत करण्यात यावा : बहुजन समाज पक्षाची मागणी

चंद्रपुर :-तामिळनाडूच्या बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष K.आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या केवळ एका व्यक्तीची हत्या नसून लोकशाही मूल्यांवर आणि राजकीय स्वातंत्र्यावरही गंभीर हल्ला आहे. या जघन्य गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) द्वारे करण्यात अशी मागणी यावी.
Investigates the murder of Tamil Nadu's B.S.P State President K. Armstro To be done through CBI : Demand of Bahujan Samaj Party
स्थानिक पातळीवर निष्पक्ष आणि सखोल तपास करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. आणि अटक करण्यात आलेल्या दोषींसोबतच या घटनेमागील प्रमुख सूत्रधारालाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिल्यास भविष्यात अश्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती थांबेल आणि कायदा व सुव्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास वाढेल.
या संबंधीचे निवेदन महामहीम राष्ट्रपती भारत सरकार , मा. पंतप्रधान भारत सरकार, मा. गृहमंत्री भारत सरकार यांना मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
या वेळी बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, चंद्रपूर विधनसभा अध्यक्ष अविनाश वानखेडे, विधानसभा सचिव खेमचंद मेश्राम ,चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहर अध्यक्ष सिध्दार्थ कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, प्रितम बोबडे, अमरदीप दसोडे, मंगेश टेबुर्णे, विवेक दुपारे, विवेक नीमगडे व इतर कार्यकर्त्याची उपस्थिती होती..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment