Ads

खापरी वार्डात नवा रस्ता व नाली तयार करा

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
शहरातील खापरी वार्ड ते हायवे पर्यंत असलेला कच्चा रस्ता पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी खराब झाला असून या रस्त्यावर चिखल व पाणी साचून असल्याने वार्डातील नागरिकांना त्रास होत आहे. या भागात के पीसीएल कंपनी वसाहत जवळील तर्फे खोदण्यात आलेल्या नालीमुळे पावसाचे पाणी या नाल्यात तुंबून ते वार्डात व नागरिकांच्या घरात शिरत आहे. याचा कमालीचा त्रास वार्डातील नागरिकांना होत आहे.
Construct new road and drain in Khapri ward.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता नव्याने बनवून पाणी जाण्यासाठी योग्य नाली तयार करावी अशी मागणी खापरी वार्डतील नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.वार्डात पावसाच्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याने या रस्त्यावर व वार्डातील सखल भागात पाणी साचलेले आहे. रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे व पायी चालणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे खापरी वार्ड, मल्हारी बाबा सोसायटीतील नागरिकांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. निवेदन सादर करताना खापरी वार्डातील नागरिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment