भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- शहरातील गोविंद लेआउट येथे राहणारे कुटुंब पाच दिवसासाठी बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून आठ तोडे सोने व रोख रक्कम दहा हजार चोरी केल्याची तक्रार भद्रावती पोलिसात शनिवारी दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊराव होकम राहणार गोविंद ले-आउट येथील कुटुंब दिनांक १ जुलाई रोज सोमवारला बाहेर गावी गेले होते व दिनांक पाच जुलै शुक्रवारला घरी परत आले असता या पाच दिवसाच्या कालावधीत घराला ताला असतांना अज्ञात ओट्याने घरात प्रवेश करून लोखंडी अलमारी मध्ये ठेवलेले १९८५ मधील लग्नाचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे कळले याप्रकरणी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली व तसेच खोबरे लेआउट येथील सय्यद रमजान यांचे घरी अज्ञात व्यक्तीने घरी कोणी नसताना घरातील प्रवेश करून गॅस सिलेंडर, साहित्य सोने व रक्कम चोरून नेली होती यांचे तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आली होती,मात्र अज्ञात चोरट्याच्या शोध लागला नाही ठानेदार बिपीन इंगळे यांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वान पथक यांना प्राचारण केले मात्र अज्ञात चोरट्यांचा शोध लागला नाही या अज्ञात चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) कलम ३०५ ( ए ) ३३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment