Ads

41 वर्षीय युवक घरातच मृतावस्थेत आढळला

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-शहरातील गौतम नगर येथे एका घरात 41 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळला. सदर घटना दिनांक 6 रोज शनिवारला सकाळी दहा वाजता उघडकीस आली.
A 41-year-old youth was found dead at home
प्रशांत बळीराम सोनटक्के वय 41 वर्षे असे या मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविला. मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही. चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथील हा युवक एका बँकेचा अभिकर्ता असून दोन दिवसांपूर्वीच तो गौतम नगर येथे एका घरात किरायाने राहण्यासाठी आला होता. घटनेच्या दिवशी घरमालकाने उशिरापर्यंत हा युवा ऊठला नसल्याने चौकशी केली असता तो मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर घरमालकाने याची माहिती भद्रावती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कारवाई केली सदर घटनेच्या पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment