चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील २५० वर्षे पुरातन असलेल्या विठ्ठल मंदिर येथे जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे सपत्नीक दर्शन घेतले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. विशेषतः शेतकरी बांधवांना यश दे, समृद्धी प्रदान कर, अशी प्रार्थना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
MLA Kishore Jorgewar took conjugal darshan of Vitthal-Rukmini at Vitthal temple
चंद्रपूरातील विठ्ठल मंदिर हे आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व यासाठी ओळखले जाते. या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमलेली असते. आजच्या या पवित्र दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक मंदिरात येऊन विठुरायाच्या चरणी माथा टेकला आणि जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली.
यावेळी विठ्ठल मंदिरचे विश्वस्त अॅड. राजेंद्र डाखोरे, अॅड. अभय पाचपोर, मोरेश्वर येरेवार, अजय कोतपल्लीवार, धन्ना येरेवार, बिंदू बडकेलवार, सपाटे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंढारे, चंद्रशेखर देशमुख, राजू जोशी, मुकेश गाडगे, सतनामसिंह मिरधा, कैलास धायगुडे, किशोर बोलमवार, शंकर दंतुलवार, दत्तू गवळी, महेश गहुकर, प्रशांत रोहणकर, अल्का मेश्राम, संजय महाकालीवार आदींची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment