अकोला प्रतिनिधी:-अकोला ,गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्याकरिता नेमण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १४ छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यरत असलेले अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चोहोट्टा बाजार येथील रहिवाशी प्रशांतकुमार पुंजाजी ताडे यांची निवड झाली आहे.
Awarded Special Seva Medal to Prashant Kumar Punjaji Tade, working at Chhatrapati Sambhajinagar
यामध्ये त्यांनी उत्तम रित्या कर्तव्य बजावले असल्यामुळे त्यांना मा. पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून हे विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण अकोला जिल्ह्यात कौतुक तसेच अभिनंदन होत आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यात विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी जवानांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले. या नक्षलग्रस्त भागात राज्यातील पोलीस तसेच राज्य राखीव बल चे जवान यांची नियुक्ती करण्यात आली होती. या मध्ये अकोला जिल्ह्यातील जवान यांची सुद्धा निवड झालेली होती...
0 comments:
Post a Comment