जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यातील घोनाड येथील 30 वर्ष वयाचा गुराखी गावालगतच्या नाल्यात पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना दिनांक पाच रोज सोमवारला दुपारनंतर घडली.
गावकऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह घटनास्थळावरून काही अंतरावरनाल्याच्या पात्रात आढळून आला. प्रशांत अरुण शेळकी व तीस वर्षे, राहणार घोणाड,असे या मृतकाचे नाव आहे. तो अविवाहित होता. घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर मृतक गाय बकऱ्या चराईचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे आपली पाळीव जनावरे घेऊन घरून निघाला. दरम्यान गावालगत असलेल्या नाल्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला. सायंकाळी सर्व जनावर परत आली. मात्र मृताक परत आला नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी घटनेच्या दिवशी त्याचा शोध घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह नाल्याच्या पात्रात आढळून आला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment