भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी:-
आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता शिवसेना शिंदे गटातर्फे शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांची निवडणूक चंद्रपूर जिल्हा प्रभारी म्हणून तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषाताई कायंदे यांची चंद्रपूर जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांच्या चंद्रपूर जिल्हा प्रथम आगमनानिमित्त भद्रावती तालुका तथा शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील पेट्रोल पंप चौकात शिवसेना जिल्हा संघटक ॲडव्होकेट युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात, ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.
Member of Legislative Council Kripal Tumane received a grand welcome by Bhadravati Shiv Sena.
यावेळी एडवोकेट युवराज धानोरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व राम मंदिराची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी कृपाल तुमाने, शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मनीषाताई कायंदे, महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सचिव शुभमदादा नवले, जिल्हा संपर्कप्रमुख किशोर राय, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य हर्षल शिंदे, जिल्हा संघटक एडवोकेट युवराज धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृपाल तुमाने यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर स्वागत समारंभाला युवा सेना जिल्हाध्यक्ष विनोद बुटले, विधानसभा संघटक नरेश काळे,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जमील शेख, महिला जिल्हाध्यक्ष मीनल आत्राम, माजी नगरसेवक प्रफुल सारवान, तृप्ती हिरादेवे, संतोष पारखी, अरविंद धिमान, सुरज खंगार, दीपक कामतवार आदी स्थानिक पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment