वरोरा :-माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने व किरण पांडव, पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार वरोरा विधानसभेचा भव्य महिला मेळावा आज सोमवारी वरोरा येथे आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याचे आयोजक नितीन मत्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी कृपाल तुमाने, आमदार विधान परिषद तथा निवडणूक प्रभारी चंद्रपूर विधानसभा यांचे अध्यक्षते खाली व डॉक्टर मनीषा कायंदे शिवसेना प्रवक्त्या तथा विधानसभा निरीक्षक चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच किशोर राय, संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडला .
यावेळी डॉक्टर मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या महिला भगिनी बद्दलच्या विविध योजनांची माहिती दिली व त्या कशा अमलात आणायच्या याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती देऊन महिला भगिनींना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले .त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार कृपाल तुमाने यांनी केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या युवकांबद्दल, वृद्धां बद्दल व महिलांबद्दल असलेल्या योजना यांची माहिती देऊन त्या अमलात कशा पद्धतीने आणायच्या त्याचा लाभ सामान्य जनतेपर्यंत कसा मिळाला पाहिजे याचे सविस्तर विवेचन करून या सर्व योजनांचा जनतेने लाभ घ्यावा अशी विनंती उपस्थित महिला भगिनी युवक व वृद्धांना केला . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वरोरा विधानसभेत मोठ्या प्रमाणात राबविली जवळपास 2500 फार्म हे वरोरा विधानसभेतून महिला भगिनींकडून भरून घेऊन संबंधित विभागाकडे सुपूर्द केले तसेच शिवसेना सदस्य नोंदणी सुद्धा मोठ्या जोमाने राबविली आज त्याचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
वरोरा विधानसभे मध्ये, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाद्वारे ज्या योजना जनतेसाठी सुरू केल्या त्या योजनांची सविस्तर माहिती प्रत्येक गावागावात जाऊन नितीन मत्ते हे सतत जनतेला देत असतात व त्यांना पूर्ण मदत करून त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
या मेळाव्याला शुभम नवले युवासेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य,हर्षल शिंदे युवा सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, मनीषा पापडकर महिला आघाडी नागपूर जिल्हा तथा जिल्हा नियोजन समिती नागपूर सदस्य, आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंद्रपूर , सौ कल्पना भुसारी उपजिल्हाप्रमुख वरोरा विधानसभा महिला आघाडी, मनिषा रोडे सरपंच बिजोनी, विलास परचाके विधानसभा समन्वयक वरोरा, श्रीकांत खंगार तालुकाप्रमुख वरोरा, कमलकांत कळसकर तालुकाप्रमुख भद्रावती, राजेश डांगे शहर प्रमुख वरोरा, पप्पू सरवण शहर प्रमुख भद्रावती, सिंगल दीप पेंदाम उपतालुकाप्रमुख भद्रावती, मदनबाबू चिकवा उपतालुकाप्रमुख माजरी विभाग भद्रावती, कुसुम वैरागडे, मनीष बुचे उपशहर प्रमुख भद्रावती, श्री चेतन घोरपडे उपशहर प्रमुख भद्रावती, भूषण बुरले व शिवसेनेचे समस्त पदाधिकारी वरोरा विधानसभेतील शेकडो महिला या मेळाव्याला उपस्थित होते
0 comments:
Post a Comment