बल्लारपूर:- सर्वत्र पाऊसाने कहर केला असून या सततच्या मुसळधार पाऊसामुळे रस्ते जलमय झाले त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत अशातच बल्लारपूर बामणी ते येनबोडी या राष्ट्रीय महामार्गावर पाऊसामुळे सर्वत्र खड्डे पडले असून या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Fix potholes on Ballarpur Bamni to Yenbodi highway immediately- MNS Mahila Sena
या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची वर्दळ जास्त प्रमाणात असल्याने वाहतुक करणे अवघड झाले असुन जीवीतहानी नाकारता येत नाही काहि विपरीत घडून जीवीतहानी होण्याआधीच या राष्ट्रीय मार्गावरील खड्डे त्वरीत दुरस्त करा अशी मागणी कल्पणा पोतर्लावार मनसे महिलासेना बल्लारपूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना निवेंदन देण्यात आले या निवेंदन प्रमुख मार्गदर्शन श्री किशोर भाऊ मडगुलवार जिल्हा सचिव व कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष असून सदर मागणी आठदिवसाचे आत पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ.कल्पना पोर्टलावार ,प्रविन दासरफ मनविसे शहर अध्यक्ष स्वप्न ब्राह्मणे राकेश आमटे तथा मनसैनिक उपस्थित होते
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment