वरोरा (प्रती):-कॅनरा बँक शाखा वरोराच्या वतीने आज दि. १५ ऑगस्ट २०२४ला स्वातंत्र्यदिनी कर्मवीर विद्यालय वरोरा येथील सहा विद्यार्थिनींना डॉ. आंबेडकर विद्या ज्योती शिष्यवृत्ती मान्यवर तसेच कॅनरा बँकचे अधिकारी यांच्याकडून प्रदान करण्यात आली.
सदर शिष्यवृत्ती ही अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या विद्यार्थ्यांना देण्यात येते वर्ग ५,६,७ च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३००० रुपये तर ८,९, १०च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली डॉ.आंबेडकर विद्या ज्योती शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात कॅनरा बँकने १५ऑगस्ट २०२३ पासून केली ,समाजात आजही काही विद्यार्थी हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा दृष्टिकोन समोर ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासत कॅनरा बँकने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे कॅनरा बँकच्या वतीने आज दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी कर्मवीर विद्यालयाच्या सहा विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली यामध्ये १)अनविशा जांभुळे, २)सोनाली सलामे ३)ऋतुजा खोब्रागडे ४)वैष्णवी येटे ५) संबोधी तामगाडगे ६)पूजा शिरसाट त्यांचा समावेश आहे
यावेळी कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक /अध्यक्ष नरेंद्र बोरीकर सर, कृष्णाजी खांडेकर सर, गोपाल कुकडे साहेब, व्यवस्थापक कॅनरा बँक वरोरा सुमित वानखेडे साहेब, अधिकारी कॅनरा बँक वरोरा ,संदीप साव, अधिकारी कॅनरा बँक वरोरा सचिन घागी कर्मचारी हे उपस्थित होते
0 comments:
Post a Comment