(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - शासनाकडून "हर घर तिरंगा" ही मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. लोकांच्या हदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मुळ कल्पना आहे.
Ex-servicemen felicitated at Sindewahi Tehsil Office under Har Ghar Triranga" campaign
हर घर तिरंगा अभियान अतर्गत सदर कार्यक्रम मध्ये दि. 14 आगस्ट रोजी तहसील कार्यालय सिंदेवाही चे तहसीलदार श्री. संदीप पानमंद, नायब तहसीलदार श्री. प्रवीण गावंडे निवडणूक नायब तहसीलदार श्री. हेमंत तेलंग व सिंदेवाही तालुका अन्न पुरवठा विभाग अधिकारी श्री. शरद लोखंडे साहेब यांच्या हस्ते माजी सैनिक श्री. पुंडलिक वलके, माजी सैनिक श्री.महेश सोनवाणे , माजी सैनिक श्री संजीव गेडेकर व माजी सैनिक श्री रमेश आत्राम यांच्या शाल, शिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सिंदेवाही तहसील कार्यालयातील सभागृह येथे दुपारी 12वाजता हा कार्यक्रम करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाच्या वेळेस माजी सैनिक महेश सोनवणे यांनीआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन यादव सर यांनी केले तर वेळात- वेळ काढून उपस्थित झालेल्या माजी सैनिकाचे आभार तहसीलदार संदीप पानमंद यांनी मानले. यावेळी सिंदेवाही तालुक्यातील तलाठी ,मंडळ अधिकारी व ईतर महसूल अधिकारी ,महसूल संलग्नित कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment