सादिक थैम:-वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एका युवतीने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून ग्रामीण भागातील मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे दाखवून दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हर्षा भोंग हिने हे यश संपादन केले आहे.
वरोरा तालुक्यातील आसी या खेड्यात राहणा-या हर्षा सुरेश भोंग या युवतीने पोलीस दलातील उपनिरीक्षक या पदासाठी 2023 मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले आहे. हर्षा ही शेतकऱ्याची मुलगी आहे हे विशेष.
आशी या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या हर्षाचे विद्यालयीन शिक्षण वरोरा येथे झाले. तिने नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेतून बीएससी ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर 2019 मध्ये कोरोना काळात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी केली व सप्टेंबर 2023 मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल १आॅगस्टला जाहीर झाला. त्यात तिने हे यश मिळवले आहे. या परीक्षेत तिला 440 पैकी 255 गुण प्राप्त झाले आहेत.
हे शिक्षण घेत असताना तिला फार अवघड जात होते.एमपीएससी च्या परीक्षेत आपणास यश मिळेल असा तिला विश्वास होता. म्हणून धीर ठेवत ती परीक्षेला सामोरी गेली व यशस्वी झाली.
निकाल जाहीर झाल्यानंतर तिचे आपल्या आशी या मूळगावी आगमन होताच गावकऱ्यांनी तिची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. तिचे यश हे आमच्या गावासाठी अभिमानाचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
या प्रवासात तिला आई-वडिलां ची साथ व सहकार्य मिळाले. त्यांनी तिला सतत प्रोत्साहन दिले. ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसोबत शिक्षक व मित्र परिवाराला देते.
0 comments:
Post a Comment