भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
तालुक्यातील जेना येथील तलाठी वामन राजूरकर हे लहान मोठ्या कामासाठी गावातील सामान्य गावकऱ्यांना कायद्याचा धाक दाखवून गावातील गावकऱ्यांना त्रास देऊन त्यांना वेठीस धरीत आहे. त्यांच्या विरोधातील अनेक तक्रारी भारतीय जनता युवा मोर्चाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या या तलाठ्याची अन्यत्र बदली करावी अशा मागणीचे निवेदन भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सचीव इम्रान खान यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे दिनांक 16 ला येथील तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.
Transfer the Talatha from Jena or else we will have a strong agitation, warns the statement of BJYM
सदर तलाठी हे कोणत्याही शासकीय कामासाठी लागणाऱ्या दाखले देण्यासाठी सर्वसामान्य गावकऱ्यांना त्रास देत आहे. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अनेक दाखल्यांची गावकऱ्यांना गरज भासत आहे. मात्र सदर तलाठ्याच्या हेकेखोर स्वभावामुळे गावातील सर्वसामान्य गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सदर निवेदनातून म्हटले आहे.सदर तलाठ्याची त्वरित बदली न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी इम्रान खान, प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अमित गुंडावार जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर
चेतन स्वान,अमर महकुलकर,राजेश कांबळे, पवण वैरागडे, अनिल महकुलकर,राहुल सतुघरे,अंकित पाठक,विकास पिंपलकर,राकेश जुमडे आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment