सादिक थैम वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या "गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" या अभियानाने वरोरा-भद्रावती विधानसभेतील स्थानिक राजकारणात नवा उत्साह आणला आहे. जिल्हाप्रमुख तथा वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात पक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती देत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
Shiv Sena (UBT) group's "Village to Branch, Shiv Sainik to Home" campaign
वरोरा तालुक्यातील पिंपळगाव (मारुती) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात "गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" अभियानांतर्गत भव्य शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याद्वारे मुकेश जिवतोडे यांनी घराघरात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित कॉर्नर सभेत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जनतेला केलेली मदत, पक्षाचे ध्येय-धोरण, आणि वरोरा-भद्रावती विधानसभेत शिवसेना (उबाठा) गटाने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियान शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील सक्रियतेचे आणि गावकऱ्यांच्या समस्यांच्या समाधानासाठी त्यांच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. यामाध्यामातून पक्षाची धोरणे आणि उपक्रम गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन यावेळी जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमात उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवदूत बंडू डाखरे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, शाखा प्रमुख विठ्ल लेडांगे, उपशाखा प्रमुख आदित्य पातुरकर, सचिव मनोज वैद्य, कोषाध्यक्ष सुभाष पातुरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय घरत, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद नक्षीने यांसारखे मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment