वरोरा तालुका प्रतिनिधी:-वरोरा तालुक्यातील खेमजई पशुवैधकीय दवाखाना श्रेणी 1 व ग्रामपंचायत खेमजई द्वारा आज दिनांक 9 आगस्ट 2024 ला "पशु संवर्धन पंधरवडा" उपक्रमा अंतर्गत दवाखाना स्तरीय गाय वासरू प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाने गावातील शेतकरी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Grand organization of hospital level cow and calf exhibition under "Animal Husbandry Fortnight" at Khemjait
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद गंपावार , सामाजिक कार्यकर्ता शेगांव (बु.) होते. .या कार्यक्रमाचे उद्घाटन कन्हैयालालजी जयस्वाल,माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती, यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मंगेश काळे,जिल्हा पशु संवर्धन अधिकारी,उप आयुक्त, चंद्रपूर,डॉ. उमेश हिरूळकर,जिल्हा पशु संवर्धन अधिकारी, चंद्रपूर यांनी आपले विचार मांडले.
प्रदर्शनात विविध जातींच्या आणि वयाच्या गायी व वासरांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती, ज्यामध्ये स्थानिक पशुपालकांनी अभिमानाने आपले पशुधन प्रदर्शित केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पशुधनाच्या संगोपनात सुधारणा कशी करता येईल, यावर तज्ञांनी आपले विचार मांडले. विशेषतः, उच्च उत्पादकता मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्राची ओळख शेतकऱ्यांना करून देण्यात आली.
पशुवैद्यकीय अधिकारी आणि कृषी तज्ञांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व करत, उपस्थितांना पशुपालनातील समस्यांवर उपाय सुचवले. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉ. मुकुंद पातोंड ,पशु संवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, आ. नि. कृ. म. वरोरा,डॉ. सुबोध गाजर्लावार पशु संवर्धन, दुग्धशास्त्र विभाग, आ. नि. कृ. म. वारोरा, डॉ. पिंपळशेंडे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आणि पशुधनाच्या आरोग्य आणि उत्पादनक्षमतेसाठी आवश्यक ती माहिती दिली
प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रहास मोरे उपसरपंच, ग्रामपंचायत खेमजई,किशोर डुकरे,सामाजिक कार्यकर्ता, आसाळा,राजुभाऊ चिकटे माजी सभापती, कृ. उ. बाजार समिती, वरोरा ईश्वर टापरे, सहायक शिक्षक जि. प. शाळा खेमजई
कुंदन राणे, चंद्रपूर प्रकल्प समन्वयक, मेघश्याम येंचलवार,सचिव ग्रामपंचायत खेमजई, मदर दूध डेअरीचे विभागीय अधिकारी आशिष शुक्ला डॉ. मनोज जोगी,शंकर धोत्रे, अनिल पेंदाम, व्यवस्थापक एम. थ्री. एम.शेगाव,विजय काळे, प्रफुल आडकीने इत्यादीनी मार्गदर्शन केले.
गाय वसरु या गटा मध्ये
प्रथम : सिद्धार्थ पेटकर, द्वितीय : अनंता
वदनलवार ,त्रितीय : शत्रुघ्न दडमल.
गट गाय मध्ये प्रथम : सिद्धार्थ पेटकर,द्वितीय : विट्ठल चौधरी,
तृतीय: बाबा रंदई.
गट :- उत्कृष्ट नर वासरू मध्ये प्रथम:-अंकित हजारे,
दृतिय:-विशाल हजारे,
तृतीय:-केशव दडमल यांना मिळाले.
गट काठानी/गावरानी
प्रमोद गायकवाड,जीवन लालसरे,माणिक श्रीरामे यांना मिळाले.
गट - मादी वासरु
रविंद्र हजारे
विशाल हजारे
केशव दडमल यांना मिळाले
या कार्यक्रमाला कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन शिवशंकर पोफळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश अघडते,पशुधन विकास अधिकारी, खेमजई यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश चौधरी यांनी केले.
खेमजई गावातील हा कार्यक्रम स्थानिक प्रशासन , शेतकरी, व आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ.आर. तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रशांत रखोंडे यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. त्यामध्ये विद्यार्थी ओम म्हळसने, शिवशंकर पोफळे, चैतन्य आटे, भगवान मुसले, धम्मदीप तेलसे, आणि पियुष पिंपळे यांचा सहभाग होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक बावणे, ईश्वर हजारे, प्रमोद गायकवाड,वैभव चौधरी,गोपाल राठोड यांचे सहकार्य विशेष उल्लेखनीय केले.
0 comments:
Post a Comment