जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
आपल्याला किमान वेतन देण्यात यावे या मागणीसह अन्य मागण्यासाठी भद्रावती नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ठेकेदारांअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे गेल्या पाच दिवसांपासून नगरपरिषद कार्यालयासमोर काम बंद व ठिय्या आंदोलन सुरू आहे.
Municipal Council contract workers' statement to Congress organized labor in-charge organizer Chotubhai. या आंदोलनाच्या मंडपाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा काँग्रेस संघटित कामगार व कर्मचारी विभागाचे नागपूर विभाग प्रभारी संघटक शेख जैरूद्दीन उर्फ छोटूभाई यांनी भेट दिली असता आंदोलन करत्या कंत्राटी कामगारांतर्फे त्यांना मागण्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी निवेदन देण्यात आले. ठेकेदारांकडून या कंत्राटी कामगारांना किमान वेतनासह त्यांचा पीएफ भरण्यात यावा व त्यांच्या विम्याचा हप्ताही भरण्यात यावा अशी मागणी शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांनी करून येत्या सोमवार पर्यंत कामगारांच्या या समस्या मार्गी न निघाल्यास आपण स्वतः कामगारांच्या आंदोलनात सहभागी होऊन व श्रम न्यायालयात दाद मागणार व कामगारांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले आहे.सदर बेमुदत काम बंद आंदोलन ठेकेदार व श्रम आयुक्त,मुख्याधिकारी डॉ,विशाखा शेळकी यांनी मंडपाला भेट दिल्यानंतर स्थगीत करण्यात आले.या आंदोलनात नगरपरीषदेतील ठेकेदारांअंतर्गत काम करणारे जवळपास ११०कामगार सहभागी झाले होते.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment