Ads

चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा त्वरित नियमित करा.

चंद्रपुर :-चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून एक दिवसा आड होणारा पाणीपुरवठा अनियमित असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. ऐन पावसाळ्यात हा त्रास होत असल्याने नागरिक त्रस्त झाली आहे शिवाय जो पाणीपुरवठा होतो तोही दूषित होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोका येण्याची भीती निर्माण झाली आहे
Immediately regularize water supply in Chandrapur city.
पाणीपुरवठा विभाग एक दिवस आड पाणी पुरवठा करतो मात्र बिल नियमितपणे वसूल करतो, हा प्रकार अन्यायकारक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमितपणे व तोही स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात करण्यात यावा या विषयाअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर पाण्यासंबंधी समस्येचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देते वेळेस शिष्टमंडळामध्ये माजी नगरसेवक वसंता भाऊ देशमुख, लता ताई बंडू जांगडे,प्रकाश चंदनखेडे ,हाजी सय्यद हारून, मोनू रामटेके, सरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम मोहम्मद इरफान शेख आदी सह चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांच्या समावेश होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment