सादिक थैम वरोरा: भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation of India)द्वारा महारोगी सेवा समिती,आनंदवनMaharogi Seva Samiti, Anandavn अंतर्गत सीता रतन हॉस्पिटलच्या रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी वीस सीटर बसची भेट देऊन आज आनंदवन येथे लोकार्पण करण्यात आले.
LIC Donated Bus to Anandvan Hospital
आज आनंदवन येथे झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे भारतीय जीवन विमा निगमचे क्षेत्रीय प्रबंधक सनोज कुमार ,प्रादेशिक प्रबंधक एन एस राघवा वरिष्ठ मंडळ प्रबंधक मलिक ,विपणन प्रबंधक अजय शुक्ला, दीपेश कटारिया, सौ पल्लवी आमटे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना सनोज कुमार यांनी आनंदवनातील निस्वार्थ व निस्पृह सेवेचे कौतुक करतानाच समाजातील सर्वांनी या क पुण्यकार्याला हातभार लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तसेच जीवन विमा निगम कडून शक्य त्या मदतीचे आश्वासन दिले. डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनाच्या वतीने आभार व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्यानेच समाजातील कुष्ठ रुग्ण, दिव्यांग बांधवांची सेवा करणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच आनंदवनाचे कार्य पाहण्यासाठी सर्वांनी आनंदवनला भेट देऊन येथील बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन हेमंत कुलकर्णी व आभार प्रदर्शन शाखा प्रबंधक मोहन गोगुलवार यांनी केले यशस्वीतेसाठी देवेंद्र वरखेडकर ,विशाल नांदुरकर ,सुनील विझवे, सचिन बोमकंटीवार व वरोरा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment