Ads

शहरातील डेंगूच्या प्रादुर्भावावर त्वरित उपाययोजना करा अन्यथा आंदोलन.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:- गेल्या काही दिवसांपासून भद्रावती शहरात डेंगूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून डेंगूच्या रुग्णाच्या संख्येत सारखी वाढ होताना दिसत आहे. डेंगूची लागण होऊन शहरातील संताजी नगर व दाते सोसायटी मधील दोन महिला दगावल्या आहेत. ही गंभीर बांध लक्षात घेऊन शहरातील डेंगूच्या प्रादुर्भावावर त्वरित आळा घालण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी भद्रावती भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रदेश सचिव इमरान खान यांच्या नेतृत्वात भद्रावती नगरपरिषद कार्यालयात देण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.
Take immediate action on the dengue outbreak in the city or protest.
सदर गंभीर बाबीची दखल न घेतल्यास भाजयुमोतर्फे याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दोन दिवसात यावर उपाययोजना सुरू करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी शिष्टमंडळास दिला आहे. शहरात सर्वत्र डेंगूचा प्रादुर्भाव वाढला असून या रोगाची लागण शहरातील अनेक नागरिक तथा लहान मुलांना होत आहे. त्यामुळे यावर आवश्यक ती उपायोजना नगरपरिषद प्रशासनातर्फे त्वरित करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना भाजयुमोचे प्रदेश सचिव इमरान खान,जिल्हा महामंत्री अमित गुंडावार, विशाल ठेंगणे,श्रीपाद भाकरे, शिवा पांढरे, केतन स्वान, अमर महाकुलकर, मनोज आष्टुनकर आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment