घाटंजी-तालुक्यातील किनारा (किन्ही) येथिल शेतकरी प्रेमदास उदेभान राठोड यांची मुलगीकु ज्योती हिने प्रथम ग्रामीण भागात राहून एम. एससी.बि.एड.उच्च शिक्षण घेत Tait परीक्षा उत्तीर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हयात शिक्षिका म्हणून कार्यान्वित झाल्या.मात्र जिद्दीची पराकाष्ठा अंगी बाळगून पुढील प्रयत्न चालू ठेवत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (एम.एच.सेट२०२४)M.H. SET 2024यात घवघवीत यश मिळविले
Ms. Jyoti Rathod succeeded in the set exam..
एका छोट्याशा गावात वास्तव्य करून शेतकरी असलेल्या प्रेमदास राठोड यांची मुलगी ज्योती राठोड या सुरुवाती पासूनच अभ्यासात हुशार व जिद्दी होती.शेतकरी बापाची मान उचावावी ही जिद्द मनाशी बाळगून तिने आपल्या शिक्षणात नेहमी प्रावीण्य मिळविले.तिचे ग्रामीण भागात राहून एम. एस.सी.बी. एड.चे शिक्षण झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्हयात शिक्षिका म्हणून कार्यान्वित झाल्या मात्र अंगी असलेली जिद्द अंगिकारून सतत अभ्यास चालू ठेवला व नुकतीच झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट परीक्षेत सुयश मिळविले.या यशाचे श्रेय ती आपल्या आई बाबांना देत आहे.तिच्या यशाचे घाटंजी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात समाज बांधावाकडून कौतुक केले जात आहे.
0 comments:
Post a Comment