राजुरा :-शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2024-2025 राजुरा तालुका स्तरावरील स्पर्धाचे उदघाट्न नुकतेच संपन्न झाले. यावेळी उदघाट्क म्हणून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे शिक्षक बादल बेले उपस्थित होते.तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाट्न.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका क्रीडा संयोजक एस. टी. विरुटकर यांची उपस्थिती होती .प्रमुख अतिथी म्हणून पी. पी. साळवे, एम. बी. पाकमोडे, भास्कर फरकाडे, मलिक काजी, हर्षल क्षीरसागर, शुभम बन्नेवार, योगिता भोयर, भार्गवी कोंडाली, ए. एम. कवाडे, पियुष सोधारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम ओलांपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तालुका क्रीडा संयोजक एस. टी.विरुटकर यांनी उपस्थित विध्यार्थीना तालुका स्तरावरील विविध स्पर्धाची माहिती दिली. राजुरा तालुका स्तरीय क्रीडा वैयक्तिक, सांघिक व मैदानी खेळ दि. 8 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे खेळले जाणार आहेत. बॅटमिनटन या खेळापासुन सुरुवात करण्यात आली. यावेळी राजुरा तालुक्यातील शिवाजी हायस्कुल, आदर्श हायस्कुल, इन्फट जिजस इंग्लिश पब्लिक स्कुल, स्टेला मॉरिस स्कुल, यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा आदी शाळांचा सहभाग होता. 14,17,19 वयोगटातील विध्यार्थीचे विविध प्रकारचे खेळ या दरम्यान खेळले जाणार आहे. विध्यार्थीच्या सर्वांगीण विकासात खेळाळूवृत्तीचे अतिशय महत्वाचे स्थान असून शाररिक, मानसिक, बौद्धिक प्रगती यामुळे साधली जाते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाट्क बादल बेले यांनी केले.
0 comments:
Post a Comment