सादिक थैम वरोरा: जीएमआर वरोरा एनर्जी लि. आणि जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशन वरोरा, यांच्या सहकार्या मधुन दिनांक 2 ऑगस्ट्र 2024 रोजी मजरा खुर्द गावातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये ड्रोन UAV द्वारे प्रिसिजन फार्मिंग उपक्रमाचे उद्घाटन श्री धनंजय देशपांडे, जीएमआर वरोरा एनर्जी लि. सीओओ थर्मल यांच्या शुभहस्से थाटात पार पडला नाबार्ड द्वारा प्रायोजित लभान सराड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. कोसरसार चे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रम स्थळी उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोन विषयी माहिती देण्यात आली की, शेती किफायतशीर करण्यासाठी ड्रोन सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक ड्रोन दीदी द्वारा देण्झात आले. कीटकनाशकांच्या फवारणीवेळी शेतकरी व मजुरांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ड्रोन तंत्रज्ञानाने कापूस सोयाबीन तसेच अन्य पिकात कीटकनाशकांची प्रभावीपणे फवारणी करता येऊ शकते. शेतीत मजूर न मिळन्याची समस्मा तसेच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून उत्पन्न वाढविण्यात देखील ड्रोन तंत्रज्ञान येणाऱ्या काळात नक्कीच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन जि एम आर वरोरा एनर्जी चे सी ओ ओ श्री धनंजय देशपांडे यांनी केले.. ड्रोन UAV द्वारे फक्त 8-10 मिनिटांत एक एकर शेतात फवारणी करण्यात येईल आणि एका दिवसात २५ एकरपेक्षा जास्त जमिनीवर फवारणी करू शकतो तसेच वर्षभरात ड्रोनच्या वापराने आणि वरोरा मधील 2000 हून अधिक शेतकरी आणि ६००० एकर जमीन पर्यंत पोहचण्याचे लक्ष जी एम आर वक्षमी फौंडेशन द्वारे निर्धाराची करण्यात आलेले आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील पहिली ड्रोन दीदी सह-पायलट यांच्याद्वारे ड्रोन चालवले जातील. एफपीओ आणि प्रकल्पातील ग प्रकल्पातील गावातील शेतकऱ्यांना ड्रोन सेवा प्रदान करेल.
शेतकऱ्यांना ड्रोनची सेवा घेऊन कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी लभान सराड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. कोसरसार, यांच्याशी संपर्क करून माहिती घेऊन आपल्या शेतामध्ये उपयोग करून घेता येईल.
उदघाट्न प्रसंगी उपस्थितांना शुभेच्छा देताना श्री धनंजय देशपांडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना शेतीकरिता कमीवेळात जास्त फायदा मिळवून देणारे ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेता पर्येन्स आले त्याचा फायदा करून घ्या आणि FPO ने भाडेतत्वावर ड्रोन देऊन ग्रामीण भागात उद्योगाला चालना मिळून आर्थिक प्रगती होऊन फायदा होऊ शकते असे उपस्थितांना मार्गदशन केले.
श्री. तृणाल फुलझेले डीडीएम नाबार्ड यांनी दूरध्वनी द्वारे या कार्यक्रमाची प्रसंशा केली तसेच या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ होऊन उत्पन्नामध्ये वाढ होईल तसेच आर्थिक फायदा होईल असे मत व्यक्त केले आणि लभान सराड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांना या उपक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या.
उदघाटन करीता तालुका कृषी अधिकारी (TAO), ग्रामसेवक, ब्लॉक कृषी सहाय्यक, लभान सराड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. कोसरसार डॉयरेक्टर, सिईओ, GWEL अधिकारी व फौंडेशन चे श्री. सुनील विश्वकर्मा, मजरा रै येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसंघ अध्यक्ष, बचत गटातील महिला सदस्म, शेतकरी आणि आसपासच्या एरियातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment