Ads

नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे कार्यालयासमोर बेमुदत काम बंद व ठिय्या आंदोलन.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती नगर परिषदेत कामावर असलेल्या कंत्राटी कामगारांनी आपल्याला किमान वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी दिनांक सहा रोज मंगळवार ला शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत एक भव्य मोर्चा काढून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत काम बंद व ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Indefinite work stoppage and sit-in protest in front of the office of municipal council contract workers.
या बेमुदत काम बंद आंदोलनात भद्रावती नगर परिषदेतील जवळपास 90 कंत्राटी कामगार सहभागी झाले आहे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी पाठिंबा दर्शविला आहे . कंत्राटी कामगारांच्या या आंदोलनामुळे शहरातील सफाई व्यवस्थेसह अन्यसेवा कोलमडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सदर कंत्राटी कामगार नगर परिषद अंतर्गत काम करीत असलेल्या विविध कंत्राटदारांकडे काम करीत आहे. मात्र या कामगारांना ठेकेदारांकडून किमान वेतन देण्यात येत नसल्याचा या कामगारांचा आरोप आहे. त्यामुळे या कामगारांची आर्थिक शोषण होऊन त्यांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत असल्यामुळे त्यांना आपले जीवन जगणे असह्य झाले आहे. शासनाच्या नियमानुसार या कामगारांना किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी कामगारांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती, मात्र नगर परिषद प्रशासनाकडून त्यांच्या मागणीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रथम शहरातून भव्य मोर्चा काढून या कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व नंतर नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत काम बंद व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment