चंद्रपुर :-दि. ०६/०८/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक, मुम्मका सुर्दशन , यांचे आदेशान्वे चंद्रपुर शहरात अवैध धंदयावर तसेच अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगाणा-यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले.
पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन, रामनगर हद्दीतील लखमापुर येथे अवैध धंदयावर तसेच अग्नीशस्त्रा संबंधाने कारवाई करणे कामी पोउपनि विनोद भुरले व पोलीस पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी कोंबीग आप्रेशन राबवुन लखमापुर येथुन आरोपी दिपक उमरे, रा. राजुरा, जि. चंद्रपुर, लखमापुर, चंद्रपुर याचेकडुन एक गावठी बनावटी अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस तसेच पोहवा/प्रकाश बलकी व पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी आरोपी विक्रम जुनघरे, रा. छत्तीसगड कॉलनी, ह.मु. लखमापुर याचे घरून एक लोखंडी धारदार तलवार मॅनसह जप्त केले. नमुद दोन्ही आरोपीतांवर पोलीस स्टेशन, रामनगर येथे भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले आहे. नमुद आरोपीस अग्निशस्त्रासंबंधाने विचारपुस करून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी मागील एक महिण्यात ३ नग बनावटी पिस्टल तसेच ०१ नग धारदार तलवार जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपी कडून एक गावठी बनावटी पिस्टल किमंत २५,०००/- रू, एक नग जिवंत काडतुस किमंत ५००/- रु, एक नग धारदार तलवार मॅनसह अंदाजे किमंत १,०००/- रू असा एकुण २६,५००/-
रूपयाचा माल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/संजय वाडई, पोहवा/प्रकाश बलकी, पोहवा/सुभाष गोहकार, पोहवा/नितीन साळवे, पोहवा/नितेश महात्मे, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/गणेश भोयर, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/मिलींद जांभुळ, पोशि/मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment