Ads

ट्रक -दुचाकीच्या अपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळी मृत्यू.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
आपल्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असताना ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील एका वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सात रोज बुधवार ला सकाळी सव्वानऊ वाजता शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवे वरील उडान पुलाजवळ घडली.
A newspaper seller died on the spot in a truck-bicycle accident
ज्ञानेश्वर एकनाथ इंगोले, वय 50 वर्ष, राहणार शास्त्रीनगर, भद्रावती असे या मृत वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर मृतक हा गेल्या वीस वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक हा नेहमीप्रमाणे आपल्या एम एच 34 सीसी 70 30 या क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरण करीत असताना उडान पुलाजवळ सीजी ०४ पीएफ 14 97 या क्रमांकाच्या चंद्रपूर वरून नागपूरकडे जाणाऱ्या केमिकल भरलेल्या ट्रकने दुचाकी ला जबर धडक दिली. याअपघातात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला व यात ज्ञानेश्वर इंगोले यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूमुळे शहरात सर्वत्र व्यक्त होत आहे.
भद्रावती - वृतपत्र विक्रेते ज्ञानेश्वर इंगोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

वृत्तपत्र वितरणाचे कार्य करीत असतांना त्यांच्या दुचाकीला ट्रक ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इश्वर चरणी पार्थणा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment