चंद्रपुर :-गेल्या कितेक वर्षापासून कोरपना, जिवती तालुका सारख्या ठिकाणी बस स्थानकाच्या नावाने शासनाने तोंडाला पाने पुसली निवडणुका आल्या की आश्वासन देऊन पुन्हा पाच वर्षे झोपे चे सोंग घेणारे लोकप्रतिनिधी.
गडचांदूर येथे जवळपास ४०/४५ हजार लोकसंख्या असलेल्या शहराला बसस्थानका शिवाय पोरके ठेवण्यात लोकप्रतिनिधी व शासन प्रशासन. यांची महत्वाची भूमिका असल्याचे दिसून येते यांच्याच हलगर्जी पणाचा निषेध म्हणून दिनांक ३०/०९/२०२४ ला जिवती कोरपना तालुका मिळून गडचांदूर शहरात भव्य रक्तदान आंदोलन करण्यात येत आहे.
अनेक वर्षापासून आमदार खासदार मंत्री व शासन प्रशासन यांनी जिवती कोरपना व गडचांदूर
बसस्थानकाच्या नावाने प्रवाश्यांच्या तोंडाला पानेच पुसली उन, वारा, पाउस व अपघात या शिवाय प्रवाश्यांना काहीच मिळले नाही उन वारा पाऊस या पासून बचाव करण्यासाठी प्रवाशी व्यापारी यांच्या दुकानाचा आसरा घेतात पण कोणत्याही लोकप्रतिनिधी यांना काहीच वाटलेp नाही तर प्रवाशांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन बस ची वाट पाहत राहावी लागतात. लोकप्रतिनिधी व शासन प्रशासन यांना जाग आणण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा चंद्रपूर च्या वतीने कोरपना, जिवती, गडचांदूर येथे नवीन बसस्थानक होण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासन प्रशासनाच्या जाग येण्यासाठी भव्य रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोदवावा असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर यांनी केले. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रक अधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले यावेळी सतिश बिडकर शैलेश विरुटकर, पंकज माणूसमारे, बंटी शिंदे, महादेव बेरड, सिध्देश्वर केंद्रे, शहर अध्यक्ष सतीश शेरे उपस्थित होते
0 comments:
Post a Comment