Ads

जागतिक फार्मसिस्ट दिवसाचे औचित्य साधून सोमय्या फार्मासि चंद्रपूर कॉलेजच्या विध्यार्थाचे विविध स्पर्धेत यश

चंद्रपुर :-महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डीफार्मच्या विध्यार्थानी विविध स्पर्धेत यश प्राप्त केले.या स्पर्धा जागतिक फार्मसिस्ट दिवसाचे औचित्य साधून फार्मासिस्ट फोरम चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आले होते.
8
Success of students of Somayya Pharmacy Chandrapur College in various competitions on the occasion of World Pharmacist Day
मान्यवर विधार्थांशी बोलत असताना आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध रोगांवर उपचार करण्यात डॉक्टरांसोबतच फार्मासिस्टचीही मोठी भूमिका आहे, फार्मासिस्टना 'केमिस्ट' देखील म्हटले जाते. ही अशी व्यक्ती आहे ज्याला औषधांबद्दल पूर्ण माहिती आहे . फार्मासिस्ट लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात
आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते .स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे.म्हणून शिक्षणासोबत इतर क्षेत्रसुद्धा निवडावे,
सोमय्या डी फार्म कॉलेज विधार्थांचा स्पर्धेत सहभाग होता, सांस्कृतिक समूह नुत्य,गीतगायन,क्रीडा स्पर्धा, एकाधिक निवड प्रश्न , क्रिकेट स्पर्धा,बॅडमिंटन , पोस्टर प्रेसेंटेशन , रांगोळी स्पर्धा,चेस तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये एकाधिक निवड प्रश्न स्पर्धेत कविता रविदास या विधार्थिनीने पहिला क्रमांक मिळविला, सोलो गायन स्पर्धेत अर्पिता खैरकार या विधार्थिनीने दुसरा क्रमांक प्राप्त केला तसेच समूह नुत्य स्पर्धेत मिळविला. सोमय्या डीफार्म विधार्थी संगानी क्रिकेट मध्ये मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त केला .तसेच सामूहिक नृत्य स्पर्धेत मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त केला, तसेच उत्कृष्ट कलाकारांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव प्रीती पी.आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर प्राचार्य मोझेस दुर्गवाड यांनी केले.तसेच प्रा.पूजा दुर्गे, प्रा.निकिता निलावार,प्रा.कीर्ती गेडाम, प्रा.विजय घई,प्रा.साक्षी वानखेडे, क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे यांचे सहकार्य्र लाभले ,तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विधार्थांचे अभिनंदन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment