जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
बदलापूर, नागभीड, बल्लारपूर,दुर्गापूर चिमूरच्या घटना ताज्या असतानाच आणखी एका विधवा महिलेवर आरोपीने अत्याचार केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे.वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त करून एका 37 वर्षीय विधवा महिलेवर आरोपीने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील मानोरा जंगलात घडली.
सदर घटनेची तक्रार पीडित महिलेने भद्रावती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. रवींद्र सोनटक्के, वय 38 वर्ष, राहणार पारवाई, तहसील कोरपणा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व शहरातील एका भागात राहणाऱ्या विधवा महिलेची ओळख होती. घटनेच्या दिवशी आरोपीने आपला वाढदिवस जंगल शिवारात साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने पीडित महिला आपल्या एका मैत्रिणीला घेऊन त्याचे सोबत जंगल शिवारात गेली. तिथे गेल्यानंतर आरोपीने सदर पिडितेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या मैत्रिणीलाही मारहाण केली. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment