गडचांदूर:- गेल्या कितेक वर्षापासून कोरपना, जिवती तालुका सारख्या ठिकाणी बस स्थानकाच्या नावाने शासनाने तोंडाला पाने पुसली निवडणुका आल्या की आश्वासन देऊन पुन्हा पाच वर्षे झोपे चे सोंग घेणारे लोकप्रतिनिधी यांना तमाचा म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर यांच्या नेतृत्वात शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध म्हणून प्रहार ने रक्तदान आंदोलन केले या आंदोलनात 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दिला
गडचांदूर येथे जवळपास ४०/४५ हजार लोकसंख्या असलेल्या शहराला बसस्थानका शिवाय पोरके ठेवण्यात लोकप्रतिनिधी व शासन प्रशासन. यांची महत्वाची भूमिका असल्याचे दिसून येते यांच्याच हलगर्जी पणाचा निषेध म्हणून दिनांक ३०/०९/२०२४ ला जिवती कोरपना तालुका मिळून गडचांदूर शहरात भव्य रक्तदान आंदोलन करण्यात आले
Prahar's Blood Donation Movement for New Bus Stand 70 Blood Donors Participated in Blood Donation Movement
अनेक वर्षापासून आमदार खासदार मंत्री व शासन प्रशासन यांनी जिवती कोरपना व गडचांदूर बसस्थानकाच्या नावाने प्रवाश्यांच्या तोंडाला पानेच पुसली उन, वारा, पाउस व अपघात या शिवाय प्रवाश्यांना काहीच मिळले नाही उन वारा पाऊस या पासून बचाव करण्यासाठी प्रवाशी व्यापारी यांच्या दुकानाचा आसरा घेतात याची प्रचती रक्तदान सुरू असताना आलेल्या वासाने दाखवून दिले तरी पण कोणत्याही लोकप्रतिनिधी यांना काहीच वाटत नाही तर प्रवाशांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन बस ची वाट पाहत राहावी लागते. लोकप्रतिनिधी व शासन प्रशासन यांना जाग आणण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा चंद्रपूर च्या जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नागरिकांचा उस्तूर्फ प्रतिसाद मिळाला. यावेळी सतिश बिडकर शैलेश विरुटकर, पंकज माणूसमारे, बंटी शिंदे, महादेव बेरड, सिध्देश्वर केंद्रे, शहर अध्यक्ष सतीश शेरे अनुप राखुंडे गजानन, फ्राफुल,दिनेश खंगारे, व अन्य रकतदात्यानी रक्तदान करून नवीन बस स्थांकसाठी पाठिंबा दिला
आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केले मात्र शासन प्रशासन लोकप्रतिनिधी अशाच प्रकारे गाफील राहील तर आम्ही प्रहारच्या ममातून समोर प्रहार स्टाईल ने आंदोलन करू सतिश बिडकर जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर
0 comments:
Post a Comment