Ads

वडीलोपार्जित जागेवर वारसान नोंद करण्यास सरपंचाचा नकार

चंद्रपुर :-वडीलोपार्जित जागेच्या सातबारा वर वारसान नोंद करण्यास मौजा दाताला चे सरपंच सुनिता देशकर ह्या नकार देत आहे तसेच संबंधित जागा वडीलोपार्जित असल्याने सुरक्षिततेसाठी वालकंपाऊंड चे बांधकाम केले असता मंदा आमटे व अन्य गुंडांकडून वालकंपाऊंडची तोडफोड केली असल्याचा आरोप कल्पना घागरगुंडे यांनी आयोजित पत्रपरीषदेत केला.
Sarpanch's refusal to register inheritance on ancestral land
यादरम्यान त्यांनी वडीलोपार्जित जागेच्या सातबारा वर नाव नोंद करण्याची मागणी केली आहे.
कल्पना मनोज घागरगुंडे ह्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर शहराचे किल्लावार्ड येथील निवासी आहे. यांची वडीलोपार्जित जागा शंकर धर्मा घागरगुंडे यांचे नावे मौजा दाताला जुनीवस्ती येथे आहे. शंकर घागरगुंडे यांचे 30 जुन 1992 ला निधन झाले. त्यांचे वारसदार भिमराव शंकर घागरगुंडे, अनिला पुनेश्वर आवळे, मंदा गोकुल आमटे हे आहे. त्यापैकी भिमराव शंकर घागरगुंडे यांचे देखील 23 आक्टेाबर 2009 रोजी निधन झाले. भिमराव यांचे वारसदार मनोज भिमराव घागरगुंडे असुन मनोज चे ही निधन 11 नोव्हेंबर 2022 रोजी झाले. मनोज यांचे वारसदार कल्पना मनोज घागरगुंडे, प्रशिल मनोज घागरगुंडे, तुषार मनोज घागरगुंडे व भुमिका मनोज घागरगुंडे आहे. मनोज यांचे वारसदारांचे नाव सातबारा वर नोंदविण्यासाठी मौजा दाताला ग्रामपंचायत येथे अर्ज केला असता अजनपर्यंत त्यावर कोणतीही कार्रवाई झाली नाही. दरम्यान 15 सप्टेंबर ला मंदा आमटे व इतर 10 ते 15 लोकांनी वालकंपाऊंडची तोडफोड केली असल्याचा फोन शेजा_यांकडून आला. त्यानंतर कल्पना घागरगुंडे व विजय गायकवाड यांनी घटनास्थलावर गेले असता. त्या अन्य लोकांनी जागेच्या कागदासंदर्भात माहीती विचारल्यास गायकवाड यांनी गाडीच्या डीक्कीतुन कागदपत्र दाखविले व पुन्हा कागदपत्र गाडीत ठेवल्यावर मंदा आमटे व अन्य उपस्थित लोकांनी गाडी चे डिक्की तोडून कागदपत्र चोरी केले. यांची तक्रार जिला पुलिस अधिक्षक यांचे कडे करण्यात आली आहे. कल्पना घागरगुंडे यांनी वारसान सातबारा पर नोंद करण्याची आणि जागेचे कागदपत्र चोरी करणा_यांवर कार्रवाई करण्याची मागणी पत्रपरीषदेत केली.
पत्रपरीषदेला कल्पना घागरगुंडे व विजय गायकवाड उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment