घाटंजी (प्रतिनिधी):- शहरातील घाटी येथील गुरूदेव वार्डातील रहिवासी सामाजिक भावनेतून नेहमी काम करणारे, जनसामान्यांच्या हाकेला धावून येणारे पत्रकार कज्जुम कुरेशी यांची पुन्हा ऑल इंडिया जमीतुल कुरेशच्या घाटंजी तालुका अध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली.
कज्जुम कुरेशी नेहमी सामाजिक श्रेत्रातील काम करण्यासाठी प्रयत्नशील असतात, सामाजिक काम म्हटले तर वेळेचे विलंब न करता धावुन जाणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण आहे,त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन,ऑल इंडिया जमीयतुल कुरैश चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मोहम्मद हनीफ कुरेशी यांनी घेऊन २०२१साली त्यांची नियुक्ती केली होती,त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर दिनांक १७/०९/२०२४ ला यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील समाज भवन येथे महाराष्ट्रातील ऑल इंडिया जमीयतुल कुरैश चे पदाधिकारी यांच्या बैठकीत, पुन्हा घाटंजी तालुका अध्यक्ष पदी कज्जुम कुरेशी यांची अविरोध निवड करण्यात आली,सदर निवड अब्दुल सादीक कुरेशी, अध्यक्ष विदर्भ झोन,ऑल इंडिया जमीयतुल कुरैश,फजल हक्क कुरैशी ऑल इंडिया कोर कमेटी सदस्य ऑल इंडिया जमीयतुल कुरैश, मोहम्मद शफी मोहम्मद शरिफ कुरैशी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया जमीयतुल कुरैश,हाजी शब्बीर कुरेशी अमरावती जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया जमीयतुल कुरैश,हनीफ कुरेशी महाराष्ट्र सदस्य ऑल इंडिया जमीयतुल कुरैश, यांनी निवड केली आहे, तसेच आगाज चौधरी अमरावती शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली,यावेळी शहरातील कुरैशी बांधव तसेच विविध ठीकाणावरून आलेले आजी माजी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 comments:
Post a Comment