Ads

खासदार बोंडे, आमदार गायकवाड यांचा निषेध

चंद्रपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गांधी चौकात आंदोलन करण्यात आले.
Protest Against MP Bonde, MLA Gaikwad by Congress
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीभ कापण्याची, तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जिभेला चटके देण्याचे वक्तव्य केले. लोकशाहीप्रधान देशात उघडपणे धमकी देण्याचा प्रकार खुद्द लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मात्र, केंद्र, राज्यातील गृह विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. यासर्व प्रकाराला केंद्र सरकारची सहमती असल्याचे दिसून येते. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे. यानंतरही देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. परंतु, केंद्रातील भाजपचे सरकार यावर कोणतीही कारवाई करीत नाही, ही बाब अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे.
त्यामुळे भाजपने अशा वाचाळवीरांना वेळीच आवर घालून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी यावेळी दिला. आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, शिवा राव, विजय नळे, राजू झोडे, अनिरुद्ध वनकर, प्रविण पडवेकर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, अनुताई दहेगावकर, प्रसन्ना शिरवार, पितांबर कश्यप, सुनीता अग्रवाल, दुर्गेश कोडाम, पिंकी दीक्षित, मनीष तिवारी, गौस खान, तवंगर खान, भालचंद्र दानव, वंदना भागवत, पप्पू सिद्दीकी, नौशाद शेख, सचिन रामटेके, राहुल चौधरी, सागर खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment