बल्लारपुर :- चंद्रपूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे व बंदुका बाळगणाऱ्यांना अटक करण्याचे विशेष आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जारी केले आहेत. त्यामुळे बल्लारपूर पोलीस ठाण्यांतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा छडा लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Ballarpur police arrested the accused with a sword
31 ऑगस्ट रोजी उत्सवादरम्यान बल्लारपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. यामध्ये आरोपी गौरव सुनील कुक्कडकर 18 याने नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने बल्लारपूरच्या किल्ला वॉर्डातील झुडपात तलवार लपवून ठेवली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करून झाडाझुडपात चौकशी केली असता एक तलवार सापडली. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी गौरव कुक्कडकर याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, एसडीपीओ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, गजानन डोईफोडे, रणविजय ठाकूर, सुनील कामठकर, संतोष दांडेवार, विकास जुमनाके, सत्या पाटील यांच्या पथकाने केली. , खंडेराव माने, लखन चव्हाण, शेखर माथनकर, वैशिष्ठ रंगारी व बल्लारपूर पोलीस पथकाने केली आहे.
0 comments:
Post a Comment