Ads

भाजप अल्पसंख्याक विभागाचे जावेद शेख यांचा शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश 

सादिक थैम वरोरा: भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष जावेद शेख यांनी जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात प्रवेश केला.
BJP Minority Department's Javed Shaikh's Shiv Sena (UBT)party Entry
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उबाठा) गट नेहमी तत्पर आहे. जिवतोडे यांच्या प्रखर कार्यशैलीला पसंती देत जावेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला.

या वेळी शेख यांच्या सोबत अमीर पठाण, अफसर शेख, मोहित गुप्ता, आवेश बाहे, अमोल भोयर, रियाझ सय्यद, आणि मोहसीन शेख यांनीही पक्ष प्रवेश केला. या सोहळ्यात उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, युवासेना जिल्हा समन्वयक आणि माजी नगरसेवक दिनेश यादव, तालुका प्रमुख विपीन काकडे, शहर प्रमुख संदीप मेश्राम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment