चंद्रपुर :- शनिवार दि.31 ऑगस्ट रोजी मुख्य नवीन बसस्थानकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष राजेश सोलापन अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
Chandrapur bus stand unveiled Photo of Dr.Babasaheb Ambedkar
चंद्रपुर आगारचे व्यवस्थापक प्रितिश एकनाथ रामटेके व आगार प्रमुख गोवर्धन उपस्थित होते. महाराष्ट्र एस.टी काँग्रेसचे विभागीय सचिव विनोद दातार हेही उपस्थित होते. सर्व एसटी चालक, वाहक कर्मचारी व प्रवाशांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
राजेश सोलापन यांनी दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वांकडून बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच प्रितीश एकनाथ रामटेके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा लावण्यासाठी आगार व्यवस्थापक प्रितिश एकनाथ रामटेके यांनी मोलाचे सहकार्य केले. या टैलचित्राचे अनावरण कार्यक्रमास डोंगरकर साहेब, अमोल कावळे, रमेश पाटील, प्रवीण वऱ्हाटे,अनुप भद्र, पवन सपकाळ, अजाबराव मनवर, आम्रपाली खोब्रागडे, सारिका जुमडे, शाहिस्ता शेख यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment