सादिक थैम :-वरोरा पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गोमांस व गोवंश यावर जप्तीची कारवाई केली.
वरोरा पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काल 13 सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी दहाच्या सुमारास कॉलरी वार्डातील अब्दुल नबी कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला. तेव्हा त्याचे घरी 150 किलो गोमांस तसेच जनावर कापायचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी कारवाई करीत जवळपास 33 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे कत्तलीसाठी आणलेले आणलेला एक बैल व एक कालवड यांनाही ताब्यात घेतले व त्यांची त्यांची रवानगी गोरक्षण मध्ये करण्यात आले.
ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी प्राणी संरक्षण व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे, मसराम, त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी दिलीप सुर,महेश व महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्या चमूने पार पाडली.
0 comments:
Post a Comment