Ads

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सर्वोदय कन्या विद्यालय अव्वल

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - क्रिडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत, तालुका क्रीडा समिती द्वारा आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 13 ते 14 सप्टेंबर रोजी सर्वोदय महाविद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात आली.
Sarvodaya Kanya Vidyalaya tops in taluka level outdoor competition
सदर मैदानी स्पर्धेत विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत अव्वल स्थान प्राप्त केले व त्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली.
यामध्ये 14 वर्षाखालील (मुली) 100 व 200 मी. धावणे अवनी नागदेवते द्वितीय, 400 व 600 मी.धावणे श्रावणी भरडकर प्रथम तसेच 17 वर्षाखालील (मुली) 100 मी.धावणे राधा सगळाम प्रथम, 1500 मी.धावणे रिमझिम साखरे प्रथम, 3000 मी.धावणे दुर्गेश्वरी डोंगरे प्रथम, गोळाफेक रिमझिम साखरे प्रथम, थाळीफेक आर्या कंदलवार द्वितीय क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल, सचिव अरविंदजी जयस्वाल, मुख्याध्यापिका संगिता यादव,पर्यवेक्षक विलास धुळेवार, क्रीडा शिक्षक कृष्णा ठिकरे व इतर शिक्षकांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment