सादिक थैम वरोरा:GMR Warora Energy Limited and GMR Kamalanga Limited जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि जी एम आर कामलांगा लिमिटेड या दोन प्रमुख ऊर्जा प्रकल्प याना भारतीय उद्योग परिसंघ (सी आई आई) यांचा मानांकित पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेला आहे हे दोन्ही प्रकल्प जी एम आर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा स्ट्रक्चर लिमिटेड याचे प्रमुख घटक आहेत.
GMR Warora Energy Limited honored 8th time with the CII National Awards.
जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड वरोरा यांनी सत्यतायांनी एनर्जी मॅनेजमेंट या अन्तर्गत हा मानांकित पुरस्कार ओळीने आठव्यांदा जिंकून एक कीर्तिमान तयार केलेला आहे. तसेच ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५ व्यांदा लीडर इन एनर्जी प्रोडक्टक्षण (राष्ट्रीय ऊर्जा उत्पादन लीडर) म्हणून पुरस्कार प्राप्त केला आहे. याच अन्तर्गत जी एम आर ची दुसरी कंपनी जी के इ ल कमलांगा याना सर्वोत्कृस्ट कार्यक्षम ऊर्जा युनिट म्हणून गौरवांकित केलेली आहे. जी एम आर ची दोन कंपनीं सि आई आई द्वारा पुरस्कार प्राप्त करणारी देशातील पहिली कंपनी ठरलेली आहे.
सी आई आई द्वारे आयोजित या राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत देशभरातील ५७० हुन अधिक नामांकित उद्योग समूहांनी सहभाग घेतलेला होता सी आई आई एनर्जी (एफीसियसि) कार्यक्षमता आणि पर्यावरण हित अंतर्गत कार्यरत उद्योग घटकांना या क्षेत्रात सर्वोत्कृस्ट कार्य करिता पुरस्कृत केले जाते. हा पुरस्कार सलग ८ वेळा प्राप्त करून जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड द्वारे पर्यावरण रक्षण, देशाची साधन सामुग्री यांचा कमीत कमी वापर आणि ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील कटिबद्धता सिद्ध केलेली आहे. मागील तीन वर्षात जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड द्वारे ऊर्जा निर्मिती करताना कमीत कमी ऊर्जेचा तसेच संसाधनांचा वापर ज्या मध्ये मागील तीन वर्षात ८५० किलो वॅट ऊर्जा निर्मिती करिता नवनवीन उपाय योजना तसेच या करीत प्रगत औदयोगिक तंत्राचा वापर आर्टीफिसिअल इंटीलिजन्स तंत्राचा वापर याचा समावेश आहे हैद्राबाद येथील राष्ट्रीय उद्योगांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जी एम आर कमलांगा याना या क्षेत्रात उत्कृस्ट प्रेसेंटेशन साठी पुरस्कृत करण्यात आले आहे. या वेळी जी एम आर यांनी ऊर्जा निर्मिती साठी कमीत कमी पाण्याचा वापर कसे केले व कमीत कमी ऊर्जेचा वापर यावर केलेल्या उपाय योजना उद्योग समूह समोर प्रस्तुत केले.
हा पुरस्कार सलग ८ वेळा प्रत केल्यावर आनंद व्यक्त करताना जी एम आर एनर्जी चे सी ई ओ श्री आशिष बासू म्हणाले कि सी आई आई द्वारा प्रदान करण्यात येणार हा पुरस्कार सातत्याने जिंकणे हेच जी एम आर एनर्जी यांची ऊर्जा क्षेत्रातील ऊर्जा उत्पादन क्षेत्रातील सर्वोत्कृस्ट प्रदर्शन औद्योगिक उच्च तंत्र यांचा वापर आणि या क्षेत्रातील सर्वोत्कृष्टता टिकवून ठेवण्याकरिता सातत्य तसेच या क्षेत्रात सातत्याने वाटचाल करण्याकरिता पुढील दिशा, रोड मॅप हे भारताच्या ऊर्जा निर्मिती क्षेत्रात कमीत कमी संसाधनांचा वापर या उद्देशाशी संलग्न ठरते. याकरिता मी जी एम आर वरोरा तसेच जी एम आर कमलांगा येथील सर्व टीम चे अभिनंदन व कौतुक करतो. जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड 600 मेगावॅट (2X300 मेगावॅट) कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्यातील वरोरा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्रात कार्यरत आहे. वीज उत्पादनानंतर वितरण करण्यासाठी PGCIL भद्रावती उपकेंद्राशी जोडलेले आहे, GWEL कंपनी ने दादर नगर हवेली पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड (DNHPDCL), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) आणि तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन (TANGEDCO) सोबत 150 MW प्रत्येकी 200 MW साठी दीर्घकालीन विद्युत पुरवठा करार केलेला आहे. सामाजिक उत्तरदायित्वासाठी SA 8000:2014 प्रमाणपत्र मिळविणारा हा पहिला प्लांट आहे तसेच आपल्या सामाजिक दायित्व करीत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहे माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांनी या उद्योगास दोन वेळा सर्वोत्कृस्ट विदुत निर्मिती केंद्र सम्मानित केलेले आहे.
0 comments:
Post a Comment