घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
वसतिगृह कर्मचाऱ्याच्या न्याय मागणीसाठी अनुदानित वसतिगृह कर्मचारी वेतनश्रेणी कृती समितीच्या वतीने दिनांक २३ पासुन आझाद मैदान, मुंबई येथे कर्मचारी यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरु आहे.
गेल्या तीस वर्षांपासुन वेतनश्रेणीचा लढा सातत्याने संघटनेच्या माध्यमातून दिला जातोय पंरतु न्याय मिळत नाही.
दरम्यान संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२/११/२०२३रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई यथे संघटनेच्या शिष्टमंडळा समवेत झालेल्या बैठकीत वेतनश्रेणीचा निर्णय घेण्यात आला . अद्याप शासन निर्णय पारीत झाला नाही.
दि. 08 आॅगस्ट 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथील अधिवेशनात मा. मुख्यमंत्री महोदयांचे आदेशाची लवकरात लवकर पुर्तता करण्याचे जाहीर आश्वासन हजारो कर्मचार्यांचे मा.ना. शंभूराजे देसाई यांनी दिले होते. मात्र अद्याप पुर्तता झाली नसल्याने कर्मचार्यांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
मा.मुख्यमंत्री महोदयांचे निर्णयाची तात्काळ अमलबजावणी करून शासन आदेश काढावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी वेतनश्रेणी कृती समिती च्या वतीने भव्य राज्यव्यापी धरणे अंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे .
सदर उपोषणास दि. 24 ला मुख्यमंत्री, दुपारी 4 वाजता माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भेट दिली. त्यानंतर दि. 25 ला मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांचे बंधु आमदार अभिजीत अडसूळ यांनी भेट देऊन मा. मुख्यमंत्री यांची भेट घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
मात्र सध्यास्थितीत अनेक कर्मचारी यांची प्रकृती बिघडली आहे. साडे सात,साडे आठ, दहा हजार प्रती महिना कमविणारे आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. आज महिला कर्मचारी शालीनी मयुर यांना दवाखान्यात भरती करण्यात आले असता कर्मचार्यांनी दिवसभर अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. त्या स्वास्थ्य बिघडल्यामुळे दवाखान्यात भरती आहेत.
राज्यातील सर्व अनुदानित वसतिगृह कर्मचार्यांनी या अंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान राज्यस्तरीय वेतनश्रेणी कृती समितीचे अध्यक्ष प्रदिप वाकपैजन यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment