राजुरा 1 ऑक्टोबर:- राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आर्वी पंचायत समिती राजुरा येथील शिक्षिका करुणा गावंडे -जांभूळकर यांनी जिल्हास्तरावरील दोन व तालुका स्तरावरील सात असे एकूण नऊ व्हिडिओ पुरस्कार मिळवून तालुक्यातून अव्वल ठरल्या आहेत.
Karuna Gawande-Jambhulkar became the top in the state level video production competition.
या स्पर्धेत गट १- इयत्ता १ ते २ गट २- इयत्ता ३ ते ५, गट ३ इयत्ता ६ ते ८, गट ४- इयत्ता ९ ते १०, गट ५- इयत्ता ११ ते १२, गट ६- अध्यापक विद्यालय अशा एकूण सहा गटात विषय निहाय स्पर्धा घेण्यात आल्या. यात करुणा गावंडे जांभूळकर यांनी विविध गटात एकूण सात व्हिडिओ अपलोड करून स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यापैकी तालुकास्तरावर तीन व्हिडिओला प्रथम क्रमांक व चार व्हिडिओला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले असून जिल्हास्तरावर एका व्हिडिओला प्रथम व एका व्हिडिओला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले आणि एकूण पन्नास हजार रुपये रोख बक्षिसाच्या त्या मानकरी ठरल्या.
करुणा गावंडे यांना तंत्रज्ञानात पूर्वीपासूनच आवड असल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून स्वतःच्या तंत्रस्नेही नावाच्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहेत. त्यांच्या या व्हिडिओचा वापर त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण देशातील विद्यार्थी सुद्धा करतात. शिक्षण क्षेत्रात तसेच तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग करणे हे त्यांचे आवडीचे कार्य असल्यामुळे या स्पर्धेतील यशाने त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांनी या यशाचे श्रेय त्यांचे विद्यार्थी ,जे नेहमी त्यांना व्हिडिओ तयार करण्यास प्रवृत्त करतात , शाळेतील प्रोत्साहन देणारे सहकारी शिक्षक व त्यांचे पती विजय जांभूळकर तंत्रज्ञानातील मार्गदर्शक उस्मान शेख सर यांना दिले.
0 comments:
Post a Comment